प्रतिनिधी /बेळगाव
सप्तसूर संगीत विद्यालयातर्फे पं. बी. व्ही. कडलास्करबुवा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत व गुरुवंदना कार्यक्रम झाला. हिंदवाडी येथील आयएमईआरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. राघवेंद्र पुरोहित, निर्मला अय्यर, जितेंद्र साबण्णावर, वामन वागुकर, प्रकाश अय्यर, निरंजन मूर्ती आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन झाले.
यावेळी सप्तसूर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्राrय संगीत, सुगम संगीत, भक्तिगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. मेघना कुलकर्णी, पूर्वी राजपुरोहित, संजना सबानी, गीता सबानी यांनी प्रार्थना सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी असलेले भाव मनोगतातून व्यक्त केले.
‘संगीत परिचय’ पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी लेखिका निर्मला प्रकाश अय्यर यांच्या ‘संगीत परिचय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नंदन हेर्लेकर, यल्लेश शास्त्राr यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघना कुलकर्णी यांनी केले तर आभार शिल्पा शिकारपूर यांनी मानले. याप्रसंगी रसिक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.