केस हा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सौंदर्याचा भाग आहे.पण सध्या केस गळणं सर्वसामान्य समस्या बनली आहे.तसेच पुरुषांना देखील अकाली पडलेलं टक्कल त्यांना त्रास देत.यावर कितीही उपाय केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही.किंवा ते उपाय तात्पुरते ठरतात.पण जर आपण केसांना पोषक असणारा आहार सेवन केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.तो आहार कसा असावा हे आज आपण जाणून घेऊया.
आपल्या रोजच्या आहारात केळं, ब्रोकोली, रताळं, मशरूम, ड्रायफ्रूट आणि अंड्याचा पिवळा बलक यांचा समावेश असायला हवा .यामधून बायोटीन मिळू शकतो.बायोटिन प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि फॅट पचायला मदत करते.यामुळे केसगळती कमी होते .तसेच केसांना योग्य पोषण मिळत.
आहारात कडधान्य, बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू यासारखे ड्रायफ्रूट, दूध, अंड, मटण अशा झिंकयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे केस दाट आणि लांब होतात. यामुळे मजबूत केसांसाठी आहारात झिंकचा समावेश करा.
आपल्या केसांसाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत आवश्यक आहे. आणि ते मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे शाकाहारी लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12ची कमतरता निर्माण होते. अशावेळी शाकाहारी लोकांनी व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट घ्यायला हव्यात.
केसांना चांगलं पोषण मिळण्यासाठी आणि अमिनो अॅसिड महत्वाचं आहे.पण हे अॅसिड शरीरात तयार होत नसल्यामुळे याच्या सप्लीमेंट मिळतात किंवा किंवा आहारामध्ये शेंगदाणे, छोले, चणे, हिरव्या शेंगा, सोयाबीन, राजमा अशा पदार्थांचा समावेश करावा.ज्यामुळे अमिनो अॅसिड मिळते
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असली तरीही केस गळती सुरु होते.व्हिटॅमिन डी हे सूर्यापासून मिळतं पण जर या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर,त्यासाठी कॅप्सूल घ्यावी.
त्यासोबतच लिंबू, आवळा, द्राक्ष, अननस, संत्री, मोसंबी यांसारख्या फळांचे सेवन केल्यामुळे केसांची चमक वाढते. तसेच केस लांबसडक देखील होतात.
Previous Articleमहाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत किडनी रॅकेटचे धागेदोरे
Next Article वाळपई रुग्णालयातील रक्त तपासणी यंत्रणेत बिघाड
Related Posts
Add A Comment