बेळगाव – आज दर्शवेळा अमावस्या आणि कृषी दिन हा योगायोग जुळून आल्याने हलगा – मच्छे येथील शेतकऱ्यांनी कसणाऱ्या जमिनीत कृषी दिन साजरा केला. हलगा – मच्छे येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हायवेसाठी बळकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे . शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत करून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सरकारने रचले असून याचा निषेध यावेळी करण्यात आला.
शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्यावा उसाला हमीभाव द्यावा विज खाजगीकरण खाजगीकरण रद्द करावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी रोगामुळे दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई द्यावी पिकाऊ जमिनीत बेकायदेशीररित्या झालेले अतिक्रमण हटवण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना इतर भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवावेत असे ठराव यावेळी सर्वांमध्ये संमत करण्यात आला.
यावेळी बेळगाव तालुका आहे रयत संघटना अध्यक्ष राजू मारवे, रयत संघटना नेते प्रकाश नायक, शेतकरी संघटना महिला जिल्हाध्यक्ष शिवलीला मिसाळे, शेकापाचे विलास गाडी, सुभाष चौगले, हनुमंत बाळेकुंद्री, भूमेश बिर्जे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
Trending
- मान्सून अरबी समुद्रात दाखल
- कोल्ड स्टोरेजला लागलेल्या आगीत कोट्यवधींचा बेदाणा, सोयाबीन जाळून खाक
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ