SambhajiRaje : हर हर महादेव या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आहेत, अशा चित्रपटामुळे चुकीचा इतिहास लोकांसमोर जातो. यापुढे ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित करताना पहिल्यांदा राज्यातील इतिहास संशोधकाना दाखवावा, मगच परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटातील अनेक गोष्टींवर आक्षेप घेतला. या चित्रपटात स्त्रियांचा बाजार भरवला जात असल्याचे दाखवले आहे. शिवाजी महाराज नृसिंहाचा अवतार असल्याचे दाखवले आहे. हे झालं आहे का कोणता इतिहासकार हे खरं आहे म्हणतो. बाजीप्रभू देशपांडे बिना पगडीचे दाखवले आहेत, बोडक्या डोक्याने मावळे कधी महाराजांच्या समोर जात नसत, लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवाल का ? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. मी जे मुद्दे मांडले आहेत ते चुकीचे आहेत हे सुबोध भावे यांनी सांगावे, मी विरोध मागे घेतो, असेही संभाजीराजे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने तणाव झाला.त्यामुळे आंदोलन होऊन आपल्या गाड्या फोडल्या. कर्नाटकात केंद्रात भाजप आहे तर तोडगा काढून न्याय द्यावा. कर्नाटकातील माणसं देखील आपलीच आहेत. मला कर्नाटक पोलिसांकडून Y प्लस सुरक्षा देण्यासाठी फोन आला होता असेही ते म्हणाले.
Trending
- श्वानाला मिळाली मानद पदविका
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
- प्रत्येक सिगारेटवर आरोग्यविषयक इशारा
- एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
- चार गॅरंटींची आज घोषणा?
- पर्यटकांमुळे अंटार्क्टिकात वितळतोय बर्फ
- आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोराला कंठस्नान
- तांत्रिक बिघाडामुळे चामराजनगरजवळ कोसळले प्रशिक्षण विमान