Hasan Mushrif And Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात यावं आणि अंबाबाईचे दर्शन घ्यावं तसेच आम्ही केलेल्या कामांचा देखील आढावा घ्यावा यावेळी आमचा एक ही कार्यकर्ता किरीट सोमय्या यांना अडवणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हे म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी ने छापा टाकला. यावेळी हसन मुश्रीफ हे कामानिमित्त जिल्हा बाहेर होते, ते काल संध्याकाळच्या सुमारास कोल्हापुरात दाखल झाले यानंतर त्यांनी माधमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घ्यावं.यावेळी राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता त्यांना अडवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही शांततेचा आवाहन केल असल्याचे त्य़ांनी म्हटलय. किरीट सोमय्या यांनी गेली पाच वर्षापासून माझ्यावर आरोप करत आहेत मात्र त्यामधून काहीही निष्पन्न झालेले नाही.मी म्हणजे एक खुली किताब आहे हे सर्व जनतेला माहित आहे.वेळ आल्यावर याबाबत स्पष्टीकरण देऊ असेही यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने कारवाई दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तेथेच थांबून होते त्य़ांचे मी आभार मानतो असेही ते म्हणाले.
Related Posts
Add A Comment