वृत्तसंस्था /सरे (ब्रिटन)
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू तसेच अव्वल फलंदाज हाशिम आमलाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. हाशिम आमला सध्या इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघाकडून खेळत होता. यापुढे आपण इंग्लीश कौंटी स्पर्धेत खेळणार नसल्याची घोषणा बुधवारी केली.
39 वषीय हाशिम आमलाने 2019 साली इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील सरे संघाबरोबर करार केला होता. 2022 साली इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया सरे संघामध्ये त्याचा समावेश होता. आपल्या जवळपास दोन दशकांच्या व्यावसायिक क्रिकेट क्षेत्रातील क्रिकेटच्या विविध प्रकारात एकूण 34,104 धावा जमविल्या आहेत. त्याने 2004 ते 2019 या कालावधीत 124 कसोटींमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना 9,282 धावा जमविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटीत सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांमध्ये आमला दुसऱया स्थानावर असून कॅलिस पहिल्या स्थानावर आहे. आमलाने आपल्या कसोटी कारकीर्दीत 28 शतके नोंदविली असून 2012 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 311 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. आमलाने 181 वनडे सामन्यात 27 शतकांसह 8113 धावा तर 44 टी-20 सामन्यात 1277 धावा जमविल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आमलाने प्रशिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.