गारगोटी प्रतिनिधी
गारगोटीसह शिंदेवाडी, आकुर्डे, खानापुर परिसरात जोरदार वीजेच्या कडकडाटासह वळीव पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झाली. आज गारगोटीचा आठवडी बाजार असल्याने व्यापारी वर्गासह व्यापार्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. ऊस पिकाला पाऊस जरी पोषक असला तरी अन्य पिकासाठी हा पाऊस नुकसान कारक ठरणार आहे.
पहा Video >>>>कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी याठिकाणी मुसळधार पाऊस
सायंकाळी 4 च्या सुमारास आकाशात ढग दाटून येऊन विजेच्या कडकडाटासह वळिवाचा पाऊस पडला. सुमारे अर्धा तास सलग पडलेल्या पावसाने जनजिवन ठप्प झाले. कुंभार कामे जोरात सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने कुंभार मंडळींची त्रेधा उडाली. आठवडी बाजारादिवशीच जोरदार पावसाने व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. वळीव पावसाने गारगोटीच्या बाजारपेठेत पाणीच पाणी केले. ग्राहकांना ही पळता भुई थोडी झाली. ऊसांच्या भरण्या सुरू असुन हा पाउस ऊस पिकाला पोषक ठरणारा आहे.