ऑनलाईन टीम/तरुण भारत
Andheri east Assembly Bypoll : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (andheri east assembly bypoll) रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मुंबई पालिकेतील नोकरीचा त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारण्यात आला नसल्याने ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयानेही आता पालिकेला फटकारले आहे. राजीनामा अद्याप का स्वीकारला नाही, याचं येत्या तासाभरात उत्तर द्या, असं म्हणत पालिकेला फटकारलं होतं. आता उच्च न्यायालयाने उद्या ११ पर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे लटक यांना पत्र द्या असे निर्देश कोर्टाने पालिकेला दिले आहेत. त्यामुळे लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
