Hitendra Kadam, son of Morgaon, won the title of best poser
महाराष्ट्र बॉडी बॉडीबिल्डर्स व सिंधदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसीएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धा 22 जानेवारी 2023 रोजी कणकवली फोंडा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील मोरगांव गावचा सुपुत्र हितेंद्र कदम याने या स्पर्धेतील बेस्ट पोजर चा किताब मिळवला रसिकांची मने या स्पर्धेत त्याने जिंकली. या अगोदरही विविध स्पर्धेत यश मिळवून त्याने,दोडामार्ग तालुक्याच्या नावलौकीकात भर घातली आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबदृल त्याचे पंचक्रोशितून अभिनंदन होत आहे.
दोडामार्ग – प्रतिनिधी