ऑनलाईन टीम/तरुण भारत
घरात महत्त्वाचा कार्यक्रम असेल किंवा लग्न समारंभ असेल तर मेहंदी ही लावलीच जाते. कोणत्याही कार्यक्रमात साडी वेअर करत असताना सोबत मेहंदी आणि केसात गजरा घालण्याला अधिक पसंदी दिली जाते. अशावेळी हातावरील मेहंदीचा गडद रंग आणि त्याचा सुगंध कार्यक्रमाची शोभा वाढवतात. लग्न समारंभात तर मेहंदीचा रंग गडद आला तर नवऱ्याचे प्रेम अधिक आहे अशी म्हण आहे. कधी-कधी मेहंदीचा रंग कमी होतो.अशावेळी घरच्या घरी काही उपाय करु शकता.ज्यामुळे मेहंदीचा रंग गडद होईल. चला तर जाणून घेऊया..

निलगिरीच्या तेलात उष्णता असते. तिच्या या गुणधर्मामुळे तुमची मेहंदी जास्त गडद रंगते. यासाठी मेहंदी लावण्यापूर्वी निलगिरीचे तेल हाताला लावा. मगच मेहंदी काढा म्हणजे रंग गडद येईल

मेहंदी काढून झाल्यावर ५ ते ६ तासांनी तुम्हाला रंग फिका आहे असे वाटेत असेल तर त्यावर विक्स, बाम, आयोडेक्स अथवा मोहरीचं तेल यापैकी कशाचाही वापर करा. हाताला लावून किमान पाच मिनिटे तसंच राहू द्या. एक दिवसाने याचा रंग अधिक गडद होतो.

मेहंदी अधिक काळ हातावर राहिली तर तिला अधिक गडद रंग चढतो. यासाठी ती वाळू लागली की तिला साखर आणि लिंबाचा रस मिक्स करुन हाताला लावा. यामुळे मेहंदी लवकर न वाळता जादा वेळ हातावर चिकटून राहते.आणि त्याला गडद रंग यायला सुरुवात होते.

मेहंदी हाताला लावल्यानंतर किमान ५ ते ६ तास पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. मेहंदी काढण्यासाठी कपड्याचा वापर करा. पाण्याने मेहंदी शक्यतो काढू नका.

मेहंदीचा रंग गडद हवा असेल तर मेहंदी वाळत आल्यावर त्याला लवंगाचा धूर द्या. किंवा लोणच्याचे तेल लावा. मेहंदीला रंग छान येईल.

मेहंदी नैसर्गिक स्वरूपातच सुकू द्यावी. तरच त्याचा रंग हातावर व्यवस्थित चढू शकतो. यासाठी ड्रायरचा वापर करू नये.

वर सांगितलेले उपाय तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही एक सोपा उपाय करु शकता. तो म्हणजे मेहंदी सुकल्यावर झोपताना हात चादरीत गुंडाळा. तुम्हाला उष्णता मिळेल आणि मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी मदत मिळते.

मेहंदी लावल्यानंतर लगेच रंगत नाही. रंग हा साधारण एक ते दोन दिवसाने चढायला सुरुवात होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस मेहंदी लावा.