धारदार हत्याराने हल्ला, कारण गुलदस्त्यात : घटनास्थळी बघ्यांची गर्दी, उद्यमबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
आंबेडकर गल्ली, मजगाव येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. त्या युवकाचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. उद्यमबाग पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यल्लेशाप्पा शिवाजी कोलकार (वय 37) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. मजगाव येथील आदिनाथ भवनजवळ त्याचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. यल्लेशाप्पाची बहीण सविता मेत्री (रा. उद्यमबाग) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद गडादी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला.
बुधवारी रात्री 10.30 ते गुरुवारी सकाळी 7.30 यावेळेत यल्लेशाप्पाचा खून झाला आहे. त्याच्या गळा, चेहरा, डोक्मयावर, पाठीवर व पायावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. भा.दं.वि. कलम 302 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत
आहेत.
लवकरच उलगडा होण्याची शक्मयता
घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. गुरुवारी दिवसभर यासंबंधी माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले होते. उपलब्ध माहितीनुसार प्राथमिक तपासाअंती सुगावा लागला असून एक-दोन दिवसांत गुन्हेगार कोण?, कशासाठी यल्लेशाप्पाचा खून झाला? याचा उलगडा होण्याची शक्मयता आहे.