बेळगाव : खाद्यपदार्थांचा दर्जा व गुणवत्तेवरून बेळगावमधील हॉटेल्सना यावर्षी १ लाख १४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील प्रमुख हॉटेल्स आणि रस्त्या शेजारील खाद्य विक्रेत्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेची वारंवार चाचणी करायला हवी. त्रुटी आढळून आल्यास कारवाईसह दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या आहार सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरणाच्या बैठकीवेळी ते बोलत होते. काही हॉटेल्समध्ये स्वयंपाक करताना अजिनोमोटो सारख्या प्रतिबंधित पदार्थांचा उपयोग केला जात आहे. अशा हॉटेल्स आणि दुकानांना सीज करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Trending
- हत्तीची विनापरवाना वाहतूक रोखली; वनविभागाची कारवाई : हत्ती ताब्यात
- लोकसभेसाठी गोव्यात 16 उमेदवार रिंगणात
- कला अकादमी सिलिंगचा काही भाग कोसळला
- भारताने घटना गोमंतकीयांवर लादली
- पंतप्रधान 27 रोजी गोव्यात
- पंचवीस वर्षांनंतर सक्रीय झालेल्यांनी श्रीपादभाऊंचा विकास अहवाल वाचावा
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा उद्या वाढदिवस
- साखळीत उद्या पहाटे वीरभद्राचा थरार…