गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं. अशावेळी कपड्यांपासून ते मेकअप कसा असावा जेणेकरून आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही याचा विचार केला जातो. सध्या बाॅलिवूडमध्ये आलिया भट्ट हिच्या कपड्याची चर्चा सुरु आहे. तिचा प्रेग्नेंसी लूक सगळ्यांनाच आवडला आहे.ज्यामध्ये ती सुंदर हि दिसत आहे आणि तिचे पोटही दिसत नाही. ती तिच्या कम्फर्टनुसार लूज-फिटिंग आणि स्टायलिश कपडे निवडत आहे. जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला स्टाईलिश लुक करायचा असेल तर या टिप्स फाॅलो करा.
सैल कपडे निवडा
जर तुम्ही गरोदर असाल आणि पोट दाखवण्यास संकोच वाटत असेल. तर तुम्ही सैल कपड्यांची निवड करा. यामध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर मोठ्या आकाराच्या शर्ट तुम्हाला ट्रेंडी लुक देऊ शकतात. किंवा हवे तसे तुम्ही शिवून घेऊ शकता.
डिझाइन करू शकता
तुम्ही असे काही कपडे निवडा जे पोटाजवळ पूर्णपणे सैल असतील. उदाहरणार्थ, तुम्ही जीन्स घातली असेल तर तुम्ही पेप्लम टॉप घालू शकता. आलिया भट्ट सारख शरारासोबत ट्यूनिक किंवा पेप्लम डिझाइन कुर्ता निवडा. पहिल्या सहा महिन्यांपर्यंतच तुम्ही अशी कपडे वापरून शकता. आलिया भट्टने ट्रेलर लॉन्चसाठी अतिशय स्मार्ट लूज फिटिंग बलून शेपचा ड्रेस निवडला. त्यामुळे पार्टीला जात असाल तर फुग्याच्या आकाराचे कपडे निवडा. ते खूप आरामदायक वाटतील.
अशा प्रिंट वापरू शकता
मोठे प्रिंट आणि गडद रंगाचे कपडे शरीराचा योग्य आकार दर्शवत नाहीत. ज्यामुळे तुम्ही बारीक दिसता. गरोदरपणात काळा, निळा आणि गडद जांभळा अशा शेड्स निवडा. ज्यावर मोठ्या प्रिंट्स किंवा फ्लोरल डिझाईन्स बनवल्या जातात. यामध्ये तुमचे पोट दिसणार नाही.
Previous Articleपुणे विद्यापीठातील तिघांना ‘मधमाशी पालन’ उपकरणासाठी पेटंट
Related Posts
Add A Comment