बॉलीवूडचा दबंग, भाईजान, तरुणींचा चाहता सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. सलमान राग आणि उद्दामपणा यासाठीहीओळखला जातो. त्याचे अनेक व्हिडिओ याआधीही व्हायरल झाले आहेत. दरम्यान आयफा 2022 च्या ग्रँड पुरस्कार सोहळ्यात ही सलमानचा उद्दामपणा दिसून आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेचे झोड उठवले आहेत. सलमानवर त्याचे चाहते का भडकले आहेत हे जाणून घेऊय़ा. (Bollywood Update News)
कोरोनानंतर पहिल्यांदा आयफा 2022 हा सोहळा होत आहेत. याचे होस्टिंग सलमान करत आहे. याचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील एका व्हिडिओत प्रसिद्ध टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रख्यात होस्ट सिद्धार्थ कन्नन हा सलमानची ओळख करुन देत असताना सलमाननं त्याला मध्येच थांबवत प्रेसला स्वताची ओळख करुन देतो .एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं सिद्धार्थनं आतापर्यत खूप बोअर केलं असून मी त्याला शांत बसायला सांगतो. अशा शब्दांत त्याचा अपमान केला. या व्हिडिओमध्ये सलमान नोरा फतेही आणि दिव्या खोसला कुमार यांच्यासोबत आहे.
पुढे सलमान म्हणतो आयफावाले कधीच काही ऐकत नाही. प्रत्येक आयफामध्ये सिद्धार्थला घेऊन येतात. हा नेहमीच प्रेक्षकांना बोअर करतो. सलमानच्या या व्हिडिओने अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान तू नेहमीच इतरांना असा अपमानित का करतो? तुला हे शोभत नाही अशा शब्दात नेटकऱ्यांनी ठणकावले आहे.
Trending
- भारत-ऑस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीसी फायनल’ आजपासून
- राष्ट्रपती मुर्मू यांना सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- युद्धात युव्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट
- मणिपूरमध्ये शोधमोहिमेदरम्यान गोळीबार, जवान हुतात्मा
- सेन्सेक्स- निफ्टीमध्ये तेजीची झुळूक
- भाडेकरूंनाही मिळणार ‘गृहज्योती’चा लाभ
- माझगाव डॉक समभागाची दमदार वाटचाल
- 6 पाणबुड्यांच्या निर्मितीच्या करारासमीप भारत अन् जर्मनी