प्रतिनिधी / बेळगाव
भरधाव ट्रकने मोटारसायकलला ठोकरल्याने रामदुर्ग तालुक्मयातील हलगत्तीजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाले. रामदुर्ग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
अर्जुन तिम्मण्णा बंडीवड्डर (वय 44) रा. हणमापूर, सुवर्णा बसाप्पा होळेन्नावर (वय 35) रा. ओबळापूर अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. अर्जुन व सुवर्णा दुचाकीवरून मुदकवीवरून रामदुर्गकडे जात होते. त्यावेळी ही घटना घडली. हलगत्तीजवळ भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक बसल्याने अर्जुन व सुवर्णा ट्रकच्या चाकात अडकून गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.