प्रतिनिधी/ बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने खगोल भौतिकशास्त्र केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन शनिवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सचे संचालक प्रा. अन्नपूर्णी सुब्रम्हण्यम यांच्या हस्ते झाले. समन्वयक डॉ. रविंद्र बी., केएलएसचे अध्यक्ष अनंत मंडगी, चेअरमन प्रदीप सावकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दोन्ही संस्थांमध्ये समन्वय करार करण्यात आला असून केंद्राच्या स्थापनेसाठी 30 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना संशोधनासाठी या केंद्राची मदत होईल असे प्रा. अन्नपूर्णी सुब्रम्हण्यम यांनी सांगितले. चेअरमन पी. एस. सावकार यांनी जीआयटी कॉलेजविषयी माहिती दिली. डॉ. रविंद्र बी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनंत मंडगी यांनी जीआयटीमध्ये राबविलेल्या उपक्रमांबद्दल कौतुक केले.
अॅस्ट्रोफिजिक्स विभागाचे समन्वयक डॉ. चेतन कोटबागे यांनी स्वागत केले. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, पी. एन. कठवी, प्रा. डी. ए. कुलकर्णी यासह इतर उपस्थित होते.