वार्ताहर /कुद्रेमनी
य् ाsथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने बैलजोडीने बैलगाडा पळविण्याच्या शर्यतीचा उद्घाटन कार्यक्रम मंगळवार दि. 28 रोजी झाला. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्फीनिटी ग्लास ओनर रामलिंग मलाप्पा पाटील होते. प्रारंभी माणिक गोवेकर यांनी प्रास्ताविक भाषणात शर्यतीच्या आयोजनाविषयी उद्देश व्यक्त केल्यानंतर मंडळाच्यावतीने आमदार हेब्बाळकर यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
य् ाावेळी शर्यतीच्या फज्जाचे पूजन बिजगर्णी ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, शर्यतीच्या गाड्याचे पूजन कुद्रेमनी पीकेपीएस उपाध्यक्ष मल्लाप्पा कदम यांच्या हस्ते झाले. यानंतर ग्रा. पं. उपाध्यक्ष विनायक पाटील, माजी सदस्य दीपक पाटील, सदस्य अरुण देवण, नागनाथ जाधव (चिरमुरी ग्रा. पं. अध्यक्ष), सदस्य शांताराम पाटील, माजी अध्यक्ष वैजू राजगोळकर, जयवंत कोकीतकर, एम. डी. पाटील, पूनम सावंत, मारुती पाटील, गीता पाटील, आरती लोहार, मारुती नाईक, इंदू जांबोटकर यांच्या हस्ते व्यासपीठावरील विविध राष्ट्रपुरूष व देवदेवतांच्या फोटोचे पूजन झाले. य् ाावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देवून गाव विकासासाठी सर्वांच्या पाठीशी असून सर्वांनी एकजुटीने गावचा विकास साधावा, असे विचार व्यक्त केले. शर्यतीसाठी पहिले बक्षीस 25 हजार, दुसरे 22 हजार, तिसरे 18 हजार, चौथे 16 हजार, पाचवे 15 हजार अशी एकूण 18 बक्षिसे असून 21 वे बक्षीस मलाप्पा कुरबर पिरनवाडीकडून मेंढा लकी आहे. शर्यतीचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.