वर्षभरात विकास निधी, कचरा प्रकल्प, वाहने मिळवून दिली : नगराध्यक्ष
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेतील सीसीटीव्ही कॅमेऱयांचे उद्घाटन शुक्रवारी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून केले. आपण वर्षभरात 5 कोटींचा विकास निधी, 5 टनांचा बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प, पालिकेसाठी वाहने मिळवून दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोन कार, ट्रक तसेच बेलिंग केलेल्या कचऱयाची उचल करण्यासाठा लिफ्टिंग यंत्र आणल्याचे त्यांनी सांगितले. बायोमिथेनेशन प्रकल्प हा दक्षिण गोव्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. सीसीटीव्ही कॅमरे बसविणे हे आपले उद्दिष्ट होते, ते आज पूर्ण झाले. त्याबद्दल आपण समाधानी आहे. याखेरीज कर्मचाऱयांची हजेरी नोंदविण्यासाठी दोन फिंगर स्कॅन यंत्रे बसविण्यात आली असून त्याचे श्रेय आपणास जात असल्याचे नगराध्यक्ष पेरेरा यांनी सांगितले.
लोहिया मैदानाच्या सुशोभिकरणाचा पहिला टप्पा जूनपर्यंत र्प्णू होईल व 18 जून रोजी त्याचे उद्घाटन होईल, असे नगराध्यक्ष पेरेरा आपल्या वर्षभरातील कामगिरीविषयी माहिती देताना सांगितले. आपणास नगराध्यक्षपद दिल्याबद्दल दिगंबर कामत, विजय सरदेसाई आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स या तिन्ही आमदारांचे तसेच सहकारी नगरसेवकांचे त्यांनी आभार मानले.