वार्ताहर /किणये
संतीबस्तवाड येथील तालीम कट्टा युवक मंडळातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीनगर, संतीबस्तवाड, नावगे क्रॉस येथे मोठ्या उत्साहात झाले.
या स्पर्धेतील प्रथम बक्षीस 71111 व चषक, दुसरे बक्षीस 41111 व चषक तिसरे बक्षीस 11111 व चषक, चौथे बक्षीस 7111 व चषक तसेच अनेक वैयक्तिक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पुरस्कर्ते अष्पाक ताशीलदार होते. बॅनर उद्घाटन ओमाना बस्तवाडकर, बसाप्पा बिरमुत्ती व गावकरी मंडळी यांनी केले. चषकाचे अनावरण प्रसाद रंगी, नागेंद्र बुडरी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामलिंग कर्लेकर, पिराजी गुरव, भरमा गुडूमकेरी, शिवाजी बस्तवाडकर, बाळू नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला आहे.