पायाभूत आरोग्य सुविधांना चालना देण्याच्या आणि पारंपारिक औषधांच्या संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन केले. आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या 9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस (WAC) मध्ये पंतप्रधान उपस्थित होते. या कार्यक्रमात पणजी, गोवा येथे जागतिक स्तरावरावरिल आयुष प्रणालीची वैज्ञानिकता, परिणामकारकता आणि सामर्थ्य यांचे प्रदर्शन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या संस्थांमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (NIUM), गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (NIH), दिल्ली यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( CM Pramod Sawant) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला जागतिक स्तरावर नवीन ओळख करून दिली आहे. त्यामुळे आज आम्ही राज्यातील आयुष डॉक्टरांसाठी गोव्यात आयुष मंत्रालय सुरू करणार आहे.” अशी त्यांनी घोषणा केली.
आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या तीनही आयुष संस्था संशोधन, आंतरराष्ट्रीय सहयोग बळकट करून एका मोठ्या लोकसंख्येला स्वस्तात आयुष सेवा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भुमिका निभातील. तसेच या संस्था देशातील प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक राज्याला परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा पुरवण्यास मदत करतील. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा हे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीद्वारे शिक्षण, संशोधन आणि रुग्ण सेवा या विषयामध्ये UG, PG आणि पोस्ट-डॉक्टरेट शिक्षणासाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतील.
Previous Articleभूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Next Article सराईत नीरज ढवळे टोळीविरूद्ध मोक्का
Related Posts
Add A Comment