खानापूर प्रतिनिधी – देशपांडे फाउंडेशनच्या वतीने लोकमान्य भवन खानापुर येथे महिला गृहउद्योग व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी महालक्ष्मी संस्थेचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, टाऊन पंचायतचे स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलुरकर, नगरसेविका मेघा कुंदर्गी जयंत तीनैकर उपस्थितीत होते. या प्रदर्शनात 40 स्टॉल उभारण्यात आले असून, या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल हलगेकर यांनी केले, तसेच खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला संघ आहेत. त्यांनी यातून प्रेरणा घेऊन छोटे-छोटे उद्योग सुरू करावेत असेही ते म्हणाले. यावेळी देशपांडे फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पाहुण्यानी प्रदर्शनात फिरून समाधान व्यक्त केले. प्रदर्शन शनिवार दि. ८ ते मंगळवार दि. ११ असे ४ दिवस चालणार आहे.
Related Posts
Add A Comment