जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पन्नास शेतकऱ्यांना अनुदान वितरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
महात्म जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहन पर अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे पैसे वर्ग केले जाणार आहेत. जिल्ह्य़ातील 50 शेतकऱ्यांना गुरुवार 20 रोजी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या हस्ते अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 अनुदान वितरणचा कार्यक्रम होणार आहे.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. योजनेतंर्गत जिल्हय़ातील पात्र शेतकऱयांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जिल्हा बँकेतील 1 लाख 23 हजार 705 आणि राष्ट्रीयकृत बँकेची 5 हजार 554 असे एकूण 1 लाख 29 हजार 262 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याच्या प्रक्रीयेला मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुबंई येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये दुपारी एक वाजता प्रारंभ होत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हय़ातील 50 पात्र शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : आरोग्य विभागातील कामचुकारांचे धाबे दणाणले