High Cholesterol: चुकीचा आहार, खराब दिनचर्या आणि जास्त विश्रांती यामुळे अनेक प्रकारचे रोग जन्माला येतात. यामध्ये लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि पक्षाघात असे अनेक आजार होवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चुकीच्या आहारामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. कोलेस्टेरॉल हे रक्तामध्ये आढळणारी एक प्रकारची चरबी आहे. शरीराला पेशींसाठी त्याची गरज असते. बहुतेक कोलेस्टेरॉल यकृताद्वारे उत्सर्जित केले जाते. उर्वरित कोलेस्टेरॉल खाण्यापिण्याद्वारे बाहेर टाकले जाते. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. चांगले कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर वाईट कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोलेस्टेरॉल रक्ताभिसरण अवरोधित करते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. जर तुम्हीही वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त असाल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही या फळांचे रोज सेवन करा. जाणून घेऊया-
सफरचंद खा
सफरचंद हृदयासाठीही खूप फायदेशीर असते. सफरचंदात पेक्टिन आढळते. पेक्टिन हे विरघळणारे फायबर आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याशिवाय सफरचंदात पॉलिफेनॉलही आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तुम्ही रोज एक सफरचंद खाणे गरजेचे आहे. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
बेरी खा
बेरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याव्यतिरिक्त, बेरीमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे देखील असतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. बेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटि इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच्यासोबत केळीही खाऊ शकतो.
संत्री खा
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी डॉक्टर नेहमीच संत्री खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही संत्री फायदेशीर ठरते.संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यासोबतच संत्र्यामध्ये आयोडीन, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम यांसारखी खनिजे आढळतात. तसेच हंगामातील सर्वोत्तम फळांपैकी संत्र हे एक उत्तम फळ आहे
Disclaimer: वाचकांपर्यत माहिती पुरवणे हा आमचा उद्देश आहे. वरील दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Related Posts
Add A Comment