ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने पीएफवरील व्याजदारात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदारांना 8.15 टक्के व्याजदर मिळणार आहे. सीबीटीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी पीएफवरील व्याज 8.1 टक्के या नीचांकी पातळीवर घसरले होते.
सीबीटी ईपीएफओबद्दल निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. केंद्रीय श्रम आणि रोजकार मंत्री भूपेंद्र यादव याचे प्रमुख आहेत. आज सीबीटीची बैठक झाली. या बैठकीत पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज 8.15 टक्के मिळणार आहे. पीएफ व्याजदर वाढीचा 6 कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार आहे. यापैकी 72.73 लाख ग्राहक हे आर्थिक वर्ष 2022 मध्ये पेन्शनधारक होते.
पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा झालेली रक्कम EPFO अनेक ठिकाणी गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.