नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली तसेच अन्य राज्यांमध्ये गाजत असलेल्या मद्यधोरण घोटाळय़ातील मुख्य आरोपी मनीष सिसोदिया यांच्या प्रवर्तन निर्देशालय कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना आणखी 5 दिवस या कोठडीत काढावे लागणार आहेत.
शुक्रवारी त्यांच्या कोठडीचा कालावधी संपणार होता. त्यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले. सिसोदियांची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने त्यांच्या कोठडीत एका आठवडय़ाची वाढ करण्यात यावी अशी मागणी ईडीने केली. मात्र, न्यायालयाने दिवसांनी कोठडी वाढविली. आता त्यांना पुन्हा 22 मार्चला न्यायालयात उपस्थित करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंग यांनी सिसोदिया यांच्यावर केलेल्या कारवाई संबंधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच धमकी दिली आहे. सिसोदियांसारख्या व्यक्तीचा तुम्ही छळ करीत आहात. जनता तुमचे हे कृत्य विसरणार नाही. सिसादिया यांनी दिल्लीत चांगल्या शाळा आणि प्रशासन दिले आहे. आपण आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत आहात, असे ते म्हणाले आहेत.