नवी दिल्ली
दागिन्यांच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱया कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात डिसेंबरच्या तिमाहीत वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात डिसेंबरच्या तिमाहीत 10 टक्के वाढ दिसली आहे. डिसेंबरअखेर कल्याण ज्वेलर्सचा करपश्चात निव्वळ नफा वाढून 148.43 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या आर्थिक वर्षात याच अवधीत कल्याण ज्वेलर्सला 134 कोटी रुपयांचा नफा झाला होता.