भारत तरुणाईचा देश आणि या तरुणाईला घडवण्याचे काम शिक्षक करत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.रत्नागिरी नजीकच्या चंपक मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या मेळाव्यात ते बोलत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो,आई-वडिलांनंतर शिक्षकांचेच आदरस्थान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुढे बोलताना म्हणाले कि,मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. मला घडवण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे. त्यावेळचीज् परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात बदल आहे.तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही,शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाहीशिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शिक्षण खात्याचा दिलेला भार ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
या शासनाने, सरकारने घेतलेले सर्व निर्णय सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून घेतले.आज शिक्षकांना फक्त ज्ञानार्जनाचे काम देणे आवश्यक आहे.मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे शासनाची जबाबदारी आहे त्या निश्चित पूर्ण केल्या जातील, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षक भवनासाठी निश्चित जागा दिली जाईल.शिक्षकांवर बंधने नको. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही शिक्षकांच्या मागण्यांसाठी संपूर्ण सहकार्य करू.जुनी पेन्शन या मागणीबाबत एक समिती स्थापन करून त्याचा योग्य निर्णय सकारात्मक पद्धतीने घेतला जाईल. राज्यातील अनेक प्रकल्प बंद होते ते पुन्हा सुरू केले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. जे होणार असेल तेच बोलणार आणि ते निश्चित करू. एकमेकांमधील प्रेम असेच वृद्धिंगत करूया असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रसंगी उद्योगमंत्री उदय स सामंत यांनी स्वागत केले. शिक्षक नेते अंबादास थांबे यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक शिक्षक संघाचे नेते यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या प्रश्न मांडले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांच्या सर्व ग्राह्य मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासीत केले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत शेख प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक भवन उभारण्याची घोषणा केली. यावेळी शिक्षण संघटनेचे नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या कार्यक्रमाला शिक्षकांची मोठी हजेरी होती.
Trending
- रस्ते कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा; मनसेचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
- कोल्हापूरच्या फुटबॉलमधून परदेशी खेळाडूंचे पॅकअप !
- Ratnagiri : बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी महामार्गावर अपघात, महिला जखमी
- मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल- मंत्री रवींद्र चव्हाण
- तू स्माईल अँबेसिडर झालास…पण त्यांचं हसू हिरावून घेतलंय; क्लाईड क्रास्टो यांचा सचिनसाठी संदेश
- शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांना अडवू नये
- 25 हजाराची लाच घेताना पारगांव ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी मुलास ताब्यात; सहायक अधीक्षकांवरही गुन्हा दाखल
- भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड