वृत्तसंस्था/ बेंगळूर
झेकमधील कार निर्माती कंपनी स्कोडाने वर्ष 2022 मध्ये भारतात 51 हजार 900 कार्सची विक्री केली असून भारत ही कंपनीसाठी तिसरी मोठी बाजारपेठ ठरली आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर कंपनीने 7 लाख 31 हजार 300 वाहनांची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. वर्षाच्या तुलनेत विकीतील ही वाढ जवळपास 128 टक्के अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वाहनांकरीता मजबुत जाळं विणण्यासोबत अलीकडेच व्हिएतनाममध्येही कंपनीने प्रवेश मिळवला आहे. आगामी काळात म्हणजे 2026 पर्यंत कंपनीला 3 नव्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात उतरवायच्या आहेत. स्कोडाच्या स्लाव्हिया सेडन व कुशाक मध्यम आकाराच्या सुव्ह गटातील कार्सची विक्री एकंदर पाहता सर्वाधिक राहिली आहे. सेमीकंडक्टरचा अपुरा पुरवठा, साखळी वितरण खंडीत होणे, युक्रेनमध्ये युद्ध, वाढता ऊर्जा खर्च व कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ या सर्व आव्हानांना तोंड देतसुद्धा कंपनीने वाहन विक्रीत चांगली कामगिरी नोंदवली आहे.
कार्सची मागणी राहणार कायम
कंपनीने ग्राहकांच्या नव्या कार्सच्या ऑर्डरीमध्ये कोणतीही घट नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागणी वाढती पाहता आगामी काळात वरीलप्रमाणे म्हटल्यानुसार 3 इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याची तयारी कंपनी सध्याला करते आहे. स्कोडाच्या इतर कामिक व कोडियाक या कार्सला जागतिक स्तरावर लोकप्रियता प्राप्त झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.