6000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बाजारात इनफिनिक्स हॉट 12 प्ले हा फोन दाखल करण्यात आला आहे. नवीन फोनचे सादरीकरण हे मागील नोव्हेंबर महिन्यात सादर केले होते. त्यामध्ये इनफिनिक्स हॉट 11 प्ले या मॉडेलचा समावेश राहिला होता. यामध्ये होल पंच डिस्प्ले डिझाईन, 13 मेगापिक्सलचा मुख्य सेंसरमध्ये डबल रिअर कॅमेरा आहे. तसेच मजबूत अशी 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.
इनफिनिक्स हॉट 12 प्ले युनीसोक टी 610 प्रोसेसरवर चालणारा असून यामध्ये 64 जीबीचे स्टोरेज आहे.
भारतातील किमत
भारतात इनफिनिक्स हॉट 12 4 जीबीसह 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत ही 8,499 रुपये निश्चित केली आहे. शँपेन गोल्ड, डेलाइट ग्रीन, होराइझन ब्लू आणि रेसिंग ब्लॅक कलर आदी पर्यायात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.