वृत्तसंस्था/ दुबई
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या ताज्या वन डे क्रिकेट सांघिक मानांकनात भारताने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय वन डे संघाने रविवारी वन डे मालिकेत इंग्लंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता.
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने वन डे क्रिकेटमधील आपले पहिले दमदार शतक नोंदवून आपल्या संघाला मालिकाविजय मिळवून दिला होता. आयसीसीच्या वन डे ताज्या मानांकनात न्यूझीलंडचा संघ 128 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर असून इंग्लंड 121 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. भारत 109 गुणांसह तिसऱया स्थानावर आला आहे. पाक 106 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.