ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) यंदाच्या मान्सून (monsoon) संदर्भात खुशखबर दिली आहे. IMD ने भारतात यंदाचा दक्षिण पश्चिम मॉन्सून सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच तर यंदाच्या मॉन्सूमधील पर्जन्यमान हे ९६ टक्के ते १०४ टक्के इतके राहण्याचा अंदाजही आयएमडीने (IMD) एका अहवालाच्या माध्यमातून मांडला आहे. यंदा ला नीना आणि अल नीनो यासारख्या परिस्थितीचा प्रभाव हा मान्सूनवर नसेल असा अंदाज आयएमडीने मांडला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.
यंदाचा मान्सून कालावधी हा भारतीयांसाठी चांगले पर्जन्यमान घेऊन येईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच याआधी हवामान विभागाकडून १९६१ ते २०१० या कालावधीचा सरासरी पावसाचा अंदाज ग्राह्य मानला जायचा. यंदाच्या वर्षी उत्तर भारतात तसेच मध्य भारतात मान्सून सामान्य असेल असा अंदाज आयएमडीने मांडला आहे. तर हिमालयाच्या भागात आणि उत्तरपश्चिमी भारतात हवामानाचा मॉन्सून सामान्य राहिल असा अंदाज मांडण्यात आला आहे.
याआधी स्कायमेटनेही भारतातील मान्सूनबाबतचा अहवाल प्रकाशित केला होता. त्यामध्ये गेल्या वर्षी मान्सूनला अडथळा ठरलेल्या ला निनासारख्या परिस्थितीचा कोणताही अडथळा यंदाच्या मान्सूनमध्ये नसेल. तसेच अल निनोचाही प्रभाव यंदाच्या मान्सूनवर नसेल. यंदाच्या मार्चमधील स्थितीवर अंदाज आयएमडीने मांडला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या निमित्ताने भारतीयांसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे.