वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
10 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सर्बियातील बेलग्रेड येथे होणाऱया वरिष्ठांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्तीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्यासह अनेक स्टार मल्लांचा समावेश करण्यात आला आहे.
सोमवारी व मंगळवारी लखनौ व सोनेपत येथे साई ट्रेनिंग सेंटरमध्ये चाचणी घेतल्यानंतर या संघाची निवड करण्यात आली. बर्मिंगहम राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक पूर्ण करणारी विनेश फोगट महिला गटाचे नेतृत्व करेल तर पुरुष फ्रीस्टाईल पथकात ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया, रवि दाहिया, 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा रौप्यजेता दीपक पुनिया यांचा समावेश आहे. राष्ट्रकुलमध्ये आपापल्या वजन गटात या तिघांनीही सुवर्णपदके मिळविली होती. त्यांना सवलत दिली असल्याने चाचणीत ते सहभागी झाले नव्हते.
भारतीय पथक ः महिला ः विनेश फोगट, सुषमा शूकेन, सरिता मोर, मानसी अहलावत, सोनम मलिक, शेफाली, निशा दाहिया, रीतिका, प्रियांका.
प्ाgरुष ः फ्रीस्टाईल ः रवि दाहिया, पंकज मलिक, बजरंग पुनिया, नवीन मलिक, सागर जगलन, दीपक मिर्का, दीपक पुनिया, विकी हुडा, विकी चहर, दिनेश धनकर. ग्रीको रोमन ः अर्जुन हलाकुर्की, ज्ञानेंदर, नीरज, आशू, विकास, सचिन, हरप्रीत सिंग, सुनील कुमार, दीपांशू, सतीश.