नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी रविवारी जागतिक भूक निर्देशांकात भारताच्या घसरलेल्या निर्देशांकाबद्दल नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
“केंद्र सरकार कोणतीही आंतरराष्ट्रीय आकडेवारी स्वीकारण्यास तयार नाही” असे सांगून देश प्रत्येक स्तरावर घसरत आहे”. असे माजी खासदार सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे. 121 देशांनी भुक निर्देशांकाच्या आकडेवारीशी सहमती दर्शविली, परंतु यामध्येस भारताच्या निर्देशांकात घट दर्शविल्यामुळे भारताने ते मान्य केलेले नाही.
येच्युरी म्हणाले कि, “सध्याच्या सरकारला एकही आंतरराष्ट्रीय आकडे मान्य नाही. आर्थिक घसरण तसेच बेरोजगारी किंवा हिंसाचाराचा राजकारणात ज्या प्रकारचा वापर सुरू असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात घसरण होत आहे.” येचुरी पुढे म्हणाले, “कोविड काळानंतर कोट्यवधी लोक गरीब झाले आहेत. परंतु त्यांना दिलासा देण्याऐवजी श्रीमंतांना कर्ज माफ करण्यात आणि त्यांना कर-सवलत देण्यात व्यस्त आहे.”
तत्पुर्वी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, हा भुकेचा निर्देशांक चुकीचा आहे, “निर्देशांकाच्या गणनेसाठी वापरल्या जाणार्या चारपैकी तीन निर्देशांक मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ते संपूर्ण लोकसंख्येचा स्थिती दर्शवू शकत नाही. कुपोषित लोकसंख्येचा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा निर्देशक अंदाजे 3,000 लोकसंख्येवर घेतल्याने एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे ते प्रतिनिधीत्व करू शकत नाही.” असे मंत्रालयाने म्हटले होते.
Previous Articleयेत्या एक महिन्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढविणार !
Related Posts
Add A Comment