मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे इंडसइंड बँकेचा समभाग सोमवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसला आहे. सोमवारी बाजारात इंट्राडे दरम्यान 5 टक्के इतका घसरत 1084 रुपयांवर खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने हल्लीच सुमंत कठापालीया यांचीच सीईओपदी पुनर्नियुक्ती केली आहे तीही 2 वर्षासाठी. याचा परिणाम बँकेच्या समभागावर नकारात्मक दिसून आला आहे.