चेन्नई
तामिळनाडूच्या सरकारी कर्मचाऱयांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून मोठी भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी रविवारी राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केली. कर्मचाऱयांच्या भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 34 टक्क्मयांवरून 38 टक्के होणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने सरकारला 2 हजार 359 कोटी रुपयांचा अतिरिक्त ताण सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारसाठी हा एक मोठा आर्थिक भार असला तरी हजारो लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.