मुंबई : मनी लॉंडरींग प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने जामिन नाकारला आहे. यामुळे माजी गृहमंत्र्यांची दिवाळी यावर्षी तुरुंगातच साजरी होण्याच्या शक्यतेमध्ये वाढ झाली आहे. मनी लॉंडरींग आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मार्फत अनिल देशमुखांची चौकशी सुरु आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनिल देशमुखांविरुद्ध कलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या कारवनाईमुळे देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. पण गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन याचिकेवरील युक्तिवादावर सुनावणी केली असता न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी जामिन नाकारला. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनरी अँजिओग्राफीच्या उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Previous Articleइम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र
Next Article कुरबर समाजाचा अनुसुचित जाती-जमातीमध्ये समावेश करा
Related Posts
Add A Comment