‘आयपीएल’चं ‘बिगुल’ वाजण्यास सज्ज !
गतविजेता ‘गुजरात टायटन्स’ अन् चार वेळचा विजेता ‘चेन्नई सुपर किंग्स’ यांच्यामध्ये अहमदाबादमध्ये होणाऱया सामन्यानं यंदाच्या ‘आयपीएल’वरील पडदा उठेल…ही 16 वी स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होत असून शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. साखळी टप्प्यात सर्व 10 संघ प्रत्येकी 7 ‘होम’ आणि 7 ‘अवे’ सामने खेळतील. 52 दिवसांच्या कालावधीत 12 ठिकाणी रंगतील त्या एकूण 70 साखळी लढती…अंतिम सामना 28 मे रोजी होणार असून ‘प्ले ऑफ’ आणि अंतिम लढतीचं वेळापत्रक तसंच ठिकाणं नंतर जाहीर केली जातील…

चेन्नई सुपर किंग्स
चार वेळा विजेतेपद मिळविलेल्या या संघानं ड्वेन ब्रॅव्हो, रॉबिन उथप्पा, ख्रिस जॉर्डन यांना सोडताना सात नव्या खेळाडूंना कराराबद्ध केलेलं असून त्यापैकी बेन स्टोक्स हा ‘मास्टरस्ट्रोक’…याशिवाय अजिंक्य राहाणेला त्यांनी ओढलंय. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कायल जेमिसनला देखील ‘सीएसके’नं खेचलं होतं. पण पाठीच्या दुखापतीमुळं जेमिसन खेळू शकणार नसल्याने त्याची जागा घेतलीय ती दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गालंदाज सिसांडा मगालानं…
संघ-एम. एस. धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पथिराना, सिमरनजित सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, महिश थिकशाना, अजिंक्य राहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिद्धू, सिसांडा मगाला, अजय मंडल, भगत वर्मा.

दिल्ली कॅपिटल्स
यंदा ‘आयपीएल किताबा’चा दुष्काळ संपवू पाहणाऱया दिल्ली कॅपिटल्सचा संघ संतुलित असला, तरी त्यांना रिषभ पंतची उणीव भासेल. पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आलीय. त्यांनी शादुर्ल ठाकूरला कोलकाता नाइट राइडर्सकडे सोपवून अमन खानला मिळविलंय. शिवाय पृथ्वी शॉ, कुलदीप यादवसह, 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार यश धुल आणि सरफराज खान यांनाही राखलंय…
संघ-डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नोर्त्झे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रेहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रोसौ.

गुजरात टायटन्स
गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात चषक जिंकणाऱया या संघानं हार्दिक पंडय़ा, मिलर, शुबमन गिलसह त्या यशात वाटा उचललेल्या बहुतांश खेळाडूंना राखलंय. मागील वर्षी ‘सनरायझर्स हैदराबाद’चा कर्णधार राहिलेल्या केन विल्यमसनला खेचून त्यांनी मोलाची भर टाकलीय, तर फारशी चमक दाखविता न आलेल्या जेसन रॉयला सोडण्यात आलंय…
संघ-हार्दिक पंडय़ा (कर्णधार), शुबमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशिद खान, राहुल तेवातिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नलकांडे, जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, केन विल्यमसन, ओडियन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल, मोहित शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्स
दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या, पण गेल्या वेळी सातव्या क्रमांकावर राहावं लागलेल्या या संघाला कर्णधार श्रेयस अय्यरची अनुपस्थिती निश्चित जाणवेल. त्याला दुखापत झाल्यानं नेतृत्व नितीश राणाकडे सोपविण्यात आलंय. त्यांनी बांगलादेशचे शकिब उल हसन, लिटन दास यासह डेव्हिड विसे, मनदीप सिंग यांना आपल्या खात्यात जमा केलंय…
संघ-नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टिम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदेसन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, लिटन दास, मनदीप सिंग, शाकिब उल हसन.

लखनौ सुपर जायंट्स
कसोटी व ‘टी20’ संघातून वगळण्यात आलेल्या राहुलची फलंदाज व कर्णधार या नात्यानं यावेळी कसोटी लागणार असून त्यांनी लिलावापूर्वीच मार्कस स्टॉइनिस व रवी बिश्नोई यांना भरती करून घेतलं होतं. शिवाय 16 कोटी खर्चून वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला करारबद्ध केलंय…
संघ-के. एल. राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन व्होरा, क्विंटॉन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पंडय़ा, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वूड, मयंक यादव, रवी बिश्नोई, निकोलस पूरन जयदेव उनादकट, यश ठाकूर, रोमारियो शेफर्ड, डॅनियल सॅम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, नवीन-उल-हक, युद्धवीर चरक.

मुंबई इंडियन्स
पाच वेळा ‘आयपीएल’चे जेते राहिलेल्या मुंबईच्या संघानं सुमारे 15 खेळाडूंना राखलंय. याशिवाय ‘आरसीबी’कडून त्यांनी डावखुरा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ मिळविलेला असला, तरी दुखापतीमुळं स्पर्धेला मुकालेला वेगवान गोलंदाज बुमराहची अनुपस्थिती त्यांना जाणवेल. जे खेळाडू सोडून देण्यात आलेत त्यापैकी एक महत्त्वाचा मोहरा म्हणजे कायरन पोलार्ड. पण पोलार्ड आता त्यांचा फलंदाजीचा प्रशिक्षक बनलाय…
संघ-रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, दुआन जॅनसेन, विष्णू विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.

पंजाब किंग्स
सातत्याच्या अभावाने ग्रासलेल्या या संघाने लिलावावेळी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनवर जास्तीत जास्त निधी खर्च करून त्याला ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनवलं. याशिवाय त्यांनी सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया असे काही खेळडू घेतलेत, तर जखमी जॉनी बेअरस्टोच्या जागी मॅथ्यू शॉर्टला सामावून घेण्यात आलंय…
संघ-शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, सॅम करन, सिकंदर रझा, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग.

राजस्थान रॉयल्स
पहिलीच स्पर्धा जिंकणाऱया या संघानं आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना राखण्यात यश मिळविलंय. आठ जणांना त्यांनी सोडून दिलेलं असलं, तरी इंग्लंडचा जो रूट, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज झाम्पा अशा महत्त्वपूर्ण खेळाडूंना आपल्या खात्यात जमा केलंय. मात्र त्यांना दुखापतीमुळे खेळणार नसलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची अनुपस्थिती जाणवेल…
संघ-संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, के. सी. करियप्पा, जेसन होल्डर, डोनोव्हॉन फेरेरा, कुणाल राठोड, ऍडम झाम्पा, के. एम, आसिफ, एम. अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पी. ए., जो रूट.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
एकाहून एक सरस खेळाडू असूनही या संघाला अजूनपर्यंत कधीच ‘आयपीएल’ जिंकता आलेली नसून फलंदाजी व गोलंदाजीतील जबरदस्त ताकदीच्या जोरावर यंदा ते चित्र बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यावेळी त्यांनी सोनू यादव, अविनाश सिंग, रीस टोपले, हिमांशू शर्मा यांना घेतलंय. त्याशिवाय त्यांनी इंग्लंडच्या विल जॅक्सलाही घेतलं होतं. पण तो जखमी झाल्यानं त्याच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलची वर्णी लागलीय…
संघ-फॅफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, रीस टोपले, हिमांशू शर्मा, मायकेल ब्रेसवेल, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंग, आर. सोनू यादव.

सनरायजर्स हैदराबाद
दोनदा ‘आयपीएल’ चषक पटकावलेल्या या संघानं (पूर्वीचं नाव ‘डेक्कन चार्जर्स’) केन विल्यमसन, निकोलस पूरनसह अनेक बडय़ा खेळाडूंना सोडून दिलेलं असलं, तरी बोली लावलेल्या 13 पैकी 12 खेळाडूंना खेचून घेतलंय. त्यात समावेश होतो तो इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक, दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन, फिरकी गोलंदाज आदिल रशिद आदींचा…
संघ-एडन मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फझलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन, आदिल रशिद, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, अकेल होसेन.
‘आयपीएल 2023’ वेळापत्रक
गट अ
मुंबई इंडियन्स
राजस्थान रॉयल्स
कोलकाता नाइट राइडर्स
दिल्ली कॅपिटल्स
लखनौ सुपर जायंट्स
गट ब
चेन्नई सुपर किंग्स
पंजाब किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
गुजरात टायटन्स
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये बरंचसं नवीन…
‘इम्पेक्ट प्लेयर’ ः खेळ सुरू होण्यापूर्वी संघांना पाच बदली खेळाडूंची नावं द्यावी लागतील अन् त्यापैकी कोणताही एक खेळाडू सामन्यादरम्यान अकरापैकी एका खेळाडूची जागा घेऊ शकेल. ज्याला बदलण्यात येईल तो खेळाडू सदर सामन्यात पुढे भाग घेऊ शकणार नाही…शिवाय जर एखाद्या संघानं आपल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश केलेला असेल, तर ते ‘इम्पेक्ट प्लेयर’ म्हणून केवळ एखाद्या भारतीय खेळाडूलाच उतरवू शकतील. तथापि, तीन किंवा त्यापेक्षा कमी परदेशी खेळाडू असल्यास बदली खेळाडूंमध्ये परदेशी खेळाडूचा समावेश करून त्याला ‘इम्पेक्ट प्लेयर’ म्हणून खेळविता येईल…
नाणेफेकीनंतर ठरणार अंतिम संघ ः यापूर्वी संघांना नाणेफेकीच्या वेळी अंतिम संघ जाहीर करावा लागायचा आणि नाणेफेकीचा निकाल कसाही लागला तरी त्यांना संघ बदलण्याची परवानगी नव्हती. तथापि, यंदा ‘आयपीएल’मध्ये नाणेफेक झाल्यानंतर संघांना त्यांचे अंतिम 11 खेळाडू ठरवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील शुभारंभी ‘टी20’ स्पर्धेत या बदलाचं दर्शन घडलं होतं…
षटकांच्या संथ गतीबद्दल मैदानातच दंड ः षटकांचा संथ वेग हा नेहमीच ‘आयपीएल’मध्ये चर्चेचा मुद्दा राहिलाय. संघांना त्यांची 20 षटकं पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. मात्र यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न करता आल्यास त्यानंतरच्या प्रत्येक षटकाच्या वेळी 30 यार्डांच्या वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षक ठेवण्याच्या बंधनाला तोंड द्यावं लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या संघानं दिलेल्या मुदतीत केवळ 18 षटकं पूर्ण केलेली असतील, तर त्यांना शेवटच्या दोन षटकांच्या वेळी सीमारेषेजवळ फक्त 4 क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी दिली जाईल…
अयोग्य हालचाल पडेल महागात ः चेंडू टाकत असताना यष्टीरक्षकानं चुकीची हालचाल केल्यास तो ‘डेड बॉल’ घोषित करण्यात होईल आणि क्षेत्ररक्षण करणाऱया संघाला पाच धावांचा दंड सहन करावा लागेल…जर क्षेत्ररक्षकानं चेंडू टाकला जात असताना चुकीची हालचाल केली, तर सदर चेंडू ‘डेड बॉल’ ठरविला जाईल आणि फलंदाजी करणाऱया संघाला पाच धावा दिल्या जातील…
‘नो बॉल’ आणि ‘वाइड’चेही पुनरावलोकन ः यापूर्वी मैदानावरील पंचानं केवळ खेळाडू बाद वा नाबाद असल्याच्या दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची मुभा असायची. नव्या बदलानुसार, आता ‘वाइड’ आणि ‘नो बॉल’लाही ‘डीआरएस’च्या कार्यकक्षेत आणलं गेलंय.
तारीख | वेळ | सामना | स्थळ |
31 मार्च | सायंकाळी 7.30 | गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स | अहमदाबाद |
1 एप्रिल | सायंकाळी 3.30 | पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स | मोहाली |
सायंकाळी 7.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स | लखनौ | |
2 एप्रिल | दुपारी 3.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स | हैदराबाद |
सायंकाळी 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स | बेंगळुरू | |
3 एप्रिल | सायंकाळी 7.30 | चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स | चेन्नई |
4 एप्रिल | सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स | दिल्ली |
5 एप्रिल | सायंकाळी 7.30 | राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स | गुवाहाटी |
6 एप्रिल | सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर | कोलकाता |
7 एप्रिल | सायंकाळी 7.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद | लखनौ |
8 एप्रिल | दुपारी 3.30 | राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स | गुवाहाटी |
सायंकाळी 7.30 | मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज | मुंबई | |
9 एप्रिल | दुपारी 3.30 | गुजरात टायटन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स | अहमदाबाद |
सायंकाळी 7.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स | हैदराबाद | |
10 एप्रिल | सायंकाळी 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. लखनौ सुपर जायंट्स | बेंगळूर |
11 एप्रिल | सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स | दिल्ली |
12 एप्रिल | सायंकाळी 7.30 | चेन्नई सुपर किंग्ज वि. राजस्थान रॉयल्स | चेन्नई |
13 एप्रिल | सायंकाळी 7.30 | पंजाब किंग्स वि. गुजरात टायटन्स | मोहाली |
14 एप्रिल | सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद | कोलकाता |
15 एप्रिल | सायंकाळी 3.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. दिल्ली कॅपिटल्स | बेंगळूर |
सायंकाळी 7.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स | लखनौ | |
16 एप्रिल | दुपारी 3.30 | मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स | मुंबई |
सायंकाळी 7.30 | गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स | अहमदाबाद | |
17 एप्रिल | सायंकाळी 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. चेन्नई सुपर किंग्ज | बेंगळूर |
18 एप्रिल | सायंकाळी 7.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स | हैदराबाद |
19 एप्रिल | सायंकाळी 7.30 | राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स | जयपूर |
20 एप्रिल | दुपारी 3.30 | पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर | मोहाली |
सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स | दिल्ली | |
21 एप्रिल | सायंकाळी 7.30 | चेन्नई सुपर किंग्ज वि. सनरायझर्स हैदराबाद | चेन्नई |
22 एप्रिल | दुपारी 3.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स | लखनौ |
सायंकाळी 7.30 | मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स | मुंबई | |
23 एप्रिल | दुपारी 3.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. राजस्थान रॉयल्स | बेंगळूर |
सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज | कोलकाता | |
24 एप्रिल | सायंकाळी 7.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स | हैदराबाद |
25 एप्रिल | सायंकाळी 7.30 | गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स | अहमदाबाद |
26 एप्रिल | सायंकाळी 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. कोलकाता नाइट रायडर्स | बेंगळूर |
27 एप्रिल | सायंकाळी 7.30 | राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज | जयपूर |
28 एप्रिल | सायंकाळी 7.30 | पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स | मोहाली |
29 एप्रिल | दुपारी 3.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. गुजरात टायटन्स | कोलकाता |
सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद | दिल्ली | |
30 एप्रिल | दुपारी 3.30 | चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्स | चेन्नई |
सायंकाळी 7.30 | मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स | मुंबई | |
1 मे | सायंकाळी 7.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर | लखनौ |
2 मे | सायंकाळी 7.30 | गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स | अहमदाबाद |
3 मे | सायंकाळी 7.30 | पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स | मोहाली |
4 मे | सायंकाळी 3.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स | लखनौ |
दुपारी 7.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स | हैदराबाद | |
5 मे | सायंकाळी 7.30 | राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स | जयपूर |
6 मे | सायंकाळी 3.30 | चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स | चेन्नई |
सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | दिल्ली | |
7 मे | दुपारी 3.30 | गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स | अहमदाबाद |
सायंकाळी 7.30 | राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद | जयपूर | |
8 मे | सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स | कोलकाता |
9 मे | सायंकाळी 7.30 | मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर | मुंबई |
10 मे | सायंकाळी 7.30 | चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स | चेन्नई |
11 मे | सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स | कोलकाता |
12 मे | सायंकाळी 7.30 | मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स | मुंबई |
13 मे | दुपारी 3.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स | हैदराबाद |
सायंकाळी 7.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स | दिल्ली | |
14 मे | दुपारी 3.30 | राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | जयपूर |
सायंकाळी 7.30 | चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स | चेन्नई | |
15 मे | सायंकाळी 7.30 | गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद | अहमदाबाद |
16 मे | सायंकाळी 7.30 | लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स | लखनौ |
17 मे | सायंकाळी 7.30 | पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स | धरमशाला |
18 मे | सायंकाळी 7.30 | सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर | हैदराबाद |
19 मे | सायंकाळी 7.30 | पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स | धर्मशाला |
20 मे | सायंकाळी 3.30 | दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स | दिल्ली |
सायंकाळी 7.30 | कोलकाता नाइट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स | कोलकाता | |
21 मे | दुपारी 3.30 | मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | मुंबई |
सायंकाळी 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर वि. गुजरात टायटन्स | बेंगळूर |