खानापूर – खानापूर तालुक्यातील नंदगड येथील बाळेकुड या शेतात मालमत्तेच्या वादातून यल्लाप्पा शांताराम गुरव (वय 36) याचा त्याच्या सख्ख्या भावाने खून केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. शेतीच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये गेल्या वर्षभरापासून वारंवार वाद व भांडणे होत होती. बुधवारी सायंकाळी या दोन भावात जोरदार वाद सुरू झाला होता. मात्र कायमची भांडणे असल्याने शेतात काम करण्याऱ्यांनी दुर्लक्ष केले .मात्र रात्री सर्व लोक शेतातून घरी आल्यानंतर पुन्हा दोन भावांमध्ये जोरदार मारामारी झाली यामारामारीत यल्लाप्पा यांच्या डोळ्यात तीखडपुड टाकून धारधार शस्त्राने वार केल्याने यल्लाप्पा गुरव हा शेतातील घरासमोरच गतप्राण झाला. तर त्याचा भाऊ जक्कापा गुरव हा गंभीर जखमी झाला असून बेळगाव येथील खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नंदगड पोलीस सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
Previous Articleजिमखाना मैदानावर उद्या क्रिकेटचा महासंग्राम
Next Article रायगड येथील अपघातात कलंबिस्त गावची महिला जागीच ठार
Related Posts
Add A Comment