वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशम वेलिंग्टन फायरबर्ड्स संघामधून बाहेर पडला आहे. वेलिंग्टन फायरबर्ड्सशी तो 4 वर्षांसाठी करारबद्ध होता.
2022-23 क्रिकेट हंगामासाठी क्रिकेट न्यूझीलंडने घोषित केलेल्या मध्यवर्ती कराराच्या क्रिकेटपटूंच्या यादीत नीशमला वगळण्यात आले. आता आगामी क्रिकेट हंगामासाठी नीशमसह कोणत्याही स्थानिक क्रिकेट क्लबने करार केलेला नाही. 2018-19 साली नीशम वेलिंग्टन फायरबर्ड्स संघात दाखल झाला होता. 31 वर्षीय नीशमने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाला पहिल्यांदा फोर्ड चषक मिळवून दिला होता. 2022 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. सध्या तो इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत नॉर्दम्पटनशायर क्लबकडून खेळत आहे.