उचगाव /वार्ताहर
उचगाव येथील हनुमान कुस्तीगीर संघातर्फे रविवार दि. 19 मार्च रोजी दुपारी 2 वाजता भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इराणच्या मल्लांची पहिल्या क्रमांकाची कुस्ती आयोजित करण्यात आली आहे.

पैलवान अली इराण महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यास बेळगाव येथे हरवून बेळगाव मल्लसम्राट किताब विजेता व आंतरराष्ट्रीय 125 किलो गटातील पैलवान तर पै. महेंद्र गायकवाड अर्जुनवीर काका पवार यांचा पट्टय़ा महेंद्र 605 नावाने गाजलेला सिकंदर शेख यास हरवलेला 125 किलो गट आंतरराष्ट्रीय सिल्वर मेडल विजेता आणि चालू वर्षाचा उप महाराष्ट्र केसरी विजेता. तर दुसऱया क्रमांकाची कुस्ती मनीष रायते अर्जुनवीर काका पवार यांचा पट्टय़ा पुणे याच्याविरुद्ध संगमेश बिराजदार कर्नाटक केसरी यांच्यामध्ये लढत होणार आहे. तिसरी क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे काशीराम पाटील यांचा पट्टय़ा तर त्याच्या विरोधात निखिल गणेशपूर सेनादन यांच्यामध्ये लढत होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी काशीराम पाटील यांचा पट्टय़ा याच्या विरोधात प्रकाश इंगळगी तालुका घोडगेरी यांच्यात होणाऱया पाचव्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी याच्या विरोधात पैलवान दयानंद, घटप्रभा यांच्यात होणार आसून अशा चटकदार 45 कुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत.
हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी उचगावमधील अनेक माझी पैलवान तसेच युवक, ग्रामस्थ, कुस्तीशौकीन सर्वजण कामाला लागले असून आखाडय़ाची पाहणी, आखाडय़ाची दुरुस्ती आणि भव्य असा आखाडा तयार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते गुंतले आहेत. उचगाव गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या मरगाईदेविच्या परिसरातील भव्य अशा तलावामध्ये हा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे. सदर तलाव प्रचंड मोठा असल्याने कुस्ती शौकिनांना कुठेही बसून या कुस्तीचा आनंद लुटता येतो.
याबरोबरच लहान-मोठय़ा अशा एकूण जवळपास 50 कुस्त्या या आखाडय़ात होणार आहेत. या कुस्ती मैदान उद्घाटन समारंभाला सर्व थरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.