प्रतिनिधी/इस्लामपूर
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या इस्लामपूर शाखेस माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.आ.पाटील यांचे स्वागत शाखाधिकारी श्रीराम खोचीकर यांनी केले. दरम्यान पाटील यांनी ‘लोकमान्य’ची माहिती घेताना बँकींग क्षेत्राविषयी चर्चा केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, खंडेराव जाधव यांच्यासह लोकमान्यच्या इस्लामपूर शाखेचे अकौंऊट असि.प्रशांत पाटील अभय पाटील, सीमा सावंत, प्राजक्ता देशपांडे, विनायक रणनवरे आदी उपस्थित होते.