Jayant Patil : आजरा तालुक्याच्या पूर्व विभागासह गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरणारा उचंगी प्रकल्प यावर्षी प्रथमच भरला. तब्बल २२ वर्षानंतर या प्रकल्पाची पूर्तता झाली असून या विभागाच्या विकासात हा प्रकल्प मोलाचे य़ोगदान देणारा ठरणार आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नावर अनेक आंदोलने या प्रकल्पावर झाली. पुनर्वसनाचे काम पुढे नेत यावर्षी पाणी अडविण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. आज या प्रकल्पाचे पाणीपूजन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खासदार संजय मंडलिक यांना खोचक टोला लगावला. सरकार आहे तोपर्यंतच खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) शिंदे गटात राहतील असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेली अडीच वर्ष मेहनत घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पासाठी कासेगावच्या भारत पाटणकर यांचा मोठा वाटा आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी ते नेहमीच सज्ज असतात. अन्याया विरोधात उभं राहण्यासाठी त्यांनी आयुष्य़भर काम केलं असं कौतुक त्यांनी केलं. यावेळी त्यांनी संजय मंडलिकांचा चिमटाही काढला. सरकार आहे तोपर्यंतच खासदार संजय मंडलिक शिंदे गटात राहतील अस वक्तव्य करताच कार्यक्रम स्थळी पिकला हशा पिकला.
Previous Articleमुलाकडून बापाचा खून
Next Article आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलिसांना पदोन्नती
Related Posts
Add A Comment