महुआ मोइत्रा, प्रियंका चतुर्वेदी आणि प्रियांका गांधींची ट्वीट करत टीका
ऑनलाईन टीम/तरुण भारत
संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत केंद्र सरकारकडून आज नव्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या, याशिवाय असंसदीय शब्दांची लिस्ट देखील केंद्राने दिली आहे. याच असंसदीय शब्दांच्या वापरवरून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्षासह तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा (TMC MP Mahua Moitra) आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Shiv Sena MP Priyanka Chaturvedi) आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी (Congress Leader Priyanka Gandhi) यांनीही केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. जुमलाजीवी शब्दांना विरोध करणाऱ्या सरकारला त्यांनी प्रश्न विचारला आहे की, देशाच्या अन्नदात्यासाठी आंदोलनजीवी शब्दाचा प्रयोग संसदेत कोणी केला होता?
दरम्यान, टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विटमध्ये लिहिले की, बसा. बसा. प्रेमाने बोला. लोकसभा आणि राज्यसभेच्या नवीन असंसदीय शब्दांच्या यादीत संघी शब्दाचा समावेश नाही. भाजप कसा भारताचा नाश करत आहे हे सांगण्यासाठी विरोधकांकडून वापरण्यात येणाऱ्या सर्व शब्दांवर बंदी घालण्याचे काम केंद्राने केले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एका जुन्या मीमचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांकाने ट्विट केली की, करायचं तर काय करु, बोलायचं तर काय बोलू? ओन्ली वाह मोदी जी वाह! हा लोकप्रिय मिम आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरत आहे.

हे ही वाचा : उगाच तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या…; मिटकरींचा केसरकरांना इशारा
प्रियांका गांधींचीही टीका
सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत केंद्र सरकारकडून आज नव्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्याआहेत. यावर प्रियंका गांधी यांनी असंसदीय शब्दांबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारची इच्छा आहे की ते भ्रष्टाचाराला भ्रष्ट न म्हणता मास्टरस्ट्रोक म्हणा. २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न सारखे वाक्य सरकारने म्हटली की त्यांना जुमलाजीवी म्हणायचं नाही, त्यांना थँक्यू बोलायचं. पण देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांबद्दल संसदेत आंदोलनजीवी असा शब्दप्रयोग कोणी केला होता?
