तरुणभारत ऑनलाइन टीम
सुप्रसिद्ध जस्टीन बीबर जगभरात लोकप्रिय आहे.त्याचे लाखो चाहते आहेत.पण जस्टीनच्या भारतातील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जस्टीन बीबरचा भारतात कॉन्सर्ट होणार आहे. १८ ऑक्टोबरला दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर त्याचा हा कार्यक्रम होणार आहे.
याआधी २०१७ ला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमध्ये जस्टीन बीबरने लाइव्ह कॉन्सर्ट केले होते.त्यावेळी या कार्यक्रमाला अनेक फिल्मस्टार्सनी हजेरी लावली होती. या वर्षी होणाऱ्या कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीला ४ जूनपासून सुरुवात होणार आहे. BookMyShow वर ही तिकीट उपलब्ध असणार आहेत. या कॉन्सर्टची घोषणा झाल्यानंतरच तिकिटांची नोंदणी सुरु झाली आहे.जस्टीस वर्ल्ड टूर’दरम्यान जस्टीन बीबर हा जगभरातील ४० देशांमध्ये जवळपास १२५ हून अधिक शो करणार आहे. मे २०२२ ते मार्च २०२३ या दरम्यान वर्ल्ड टूर असणार आहे. आतापर्यंत या वर्ल्ड टूरमधील कॉन्सर्टची जवळपास १३ लाख तिकीटे विकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.