दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा अन् लाखो भाविक ही शतकानुशतके सुरु असलेली परंपरा गेली दोन वर्षे कोरोनामुळे खंडित झाली होती. कोरोनाचे संकट टळल्यानंतर यंदाची चैत्री यात्रा गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि चांगभलं च्या अखंड गजरात अभूतपूर्व उत्साहात शनिवारी साजरी झाली. दक्षिनाधीश जोतिबा देवाच्या चरणी नतमस्तक होत लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता. याच यात्रेची इम्रान गवंडी यांनी कॅमेराबद्ध केलेली काही क्षणचित्रे…












