सिग्नेच स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी टी-20 क्रिकेट स्पर्धा : प्रशांत लायंदर, अनिल चौगुले सामनावीर पुरस्काराचे मानकरी

बेळगाव : सिग्निचर स्पोर्ट्स क्लब आयोजित किरण जाधव पुरस्कृत नरेंद्र कुलकर्णी स्मृती चषक डी व सी विभागीय टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा 5 धावांनी तर अॅक्सेस सीसीआय संघाने बीएससी संघाचा 7 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. प्रशांत लायंदर, अनिल चौगुले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. य् ाgनियन जिमखाना मैदानावर आयोजित नरेंद्र कुलकर्णी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बुधवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 152 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 2 षटकार आणि 8 चौकारासह 67, आदी नलवडे व शिवाजी पाटील यांनी प्रत्येकी 28 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे अक्षित जैनने 27 धावात 3 तर स्वयमने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्सने 20 षटकात 7 गडी बाद 147 धावाच केल्या. त्यात ओम पाटीलने 2 चौकारासह 50 तर ओमकार सातवडेकरने 1 षटकार, 3 चौकारासह 30 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे अनंत माळवी 22 धावात 3 तर सुनील सक्री 17 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात बीएससीने प्रथम फलंदाजी करताना 15.4 षटकात सर्व गडी बाद 94 धावा केल्या. त्यात आप्पाजी पाटील व पवन जी. यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. अॅक्सेस सीसीआयतर्फे अनिल चौगुलेने 3 धावात 3 तर सौरव कारेकरने 17 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅक्सिस स्पोर्ट्सने 15 षटकात 7 गडी बाद 95 धावा करून सामना तीन गड्यांनी जिंकला. त्यात अमित काळेने 3 चौकारासह 22, अजय बाडी 4 चौकारासह 23 तर अभिषेक देशपांडेने 13 धावा केल्या. बीएससीतर्फे अप्पाजी पाटीलने 12 धावात 2 तर परशरामने एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे चंदन कुंदरनाड यांच्या हस्ते सामनावीर प्रशांत लायंदर व इम्पॅक्ट खेळाडू अमित माळवी यांना चषक देऊन गौरवण्यात आले. तर दुसऱ्या सामन्यात प्रमुख पाहुणे राहुल नाईक व अनिल गवी सामनावीर अनिल चौगुले, इम्पॅक्ट खेळाडू प्रवीण कराडे यांना चषक देऊन गौरवण्यात आले.a