सातारा : कास पठारावर आज कास महोत्सव 2022 याचा उद्घाटन सोहळा पार पाडला. मा. राज्य उत्पादक शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच जिल्हाधिकारी ऋचेस जयवंशी आणि अन्य जिल्हा प्रशासन उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेला कास महोत्सव आज प्रारंभ सुरु झाला. कोणत्याही प्रकारची वृक्ष वृक्षतोड न करता, तसेच वनाधिकाऱ्यांची चर्चा करून हे ठिकाण निवडण्यात आलेले होते. आयोजन करताना सातारा जिल्ह्यात येणारे पर्यटक हे आकर्षित व्हावेत आणि पर्यटक हे जास्त प्रमाणात त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. स्थानिकांना तेथील गावातील वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.अशी माहीती साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेष जयवंशी यांना माध्यमांना दिली.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती उल्लेखनिय होती. यावेळी बोलताना ते म्हणाले “जगात अनेक ठिकाणी फिरलो परंतु कासारखा परिसर मी कुठेच पाहिला नाही. माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. तसेच काही चांगल्या कामांवर नेहमी टीका होत असते ते मुख्य प्रचारक आहेत असे आम्ही म्हणतो.” असे बोलून त्यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता टोला हाणला.
Previous Articleयंदाचा नोबेल शांतता पुरस्कार अॅलेस बिलियात्स्की जाहीर
Next Article लडाखमध्ये भूस्खलन, 6 जवानांना वीरमरण
Related Posts
Add A Comment