डोंबिवली : राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी मविआ सरकारवर टीकेचे झोड उठवले आहेत. दरम्यान यात आता मनसेने देखील उडी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सध्या सुरू आहे. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीत चौका-चौकात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. ”आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय कारण पेराल तेच उगवणार” असे या बॅनवर लिहिले आहे. याची चर्चा परिसरात होत आहे.
सध्या राज्यात राजकीय वातावरण तापत आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी कोणताही पक्ष समोर येत नाही किंवा चर्चा करत नाही, विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या जात नाहीत अशी नाराजी विद्यार्थ्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी महासंपर्क संवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यासाठी कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद दाखवण्यासाठी मनसे कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बॅनरबाजी करत मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत. या बॅनरवर अमित ठाकरे यांचा फोटो असून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो देखील झळकले आहेत.
Previous Articleद्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी
Next Article शिवसेनेतर्फे लोकमान्य टिळक जयंती साजरी
Related Posts
Add A Comment