प्रतिनिधी /शिरोडा
शिरोडा मतदारसंघातील मगो पक्षाचे समन्वयक संकेत नाईक मुळे यांनी नाताळानिमित्त आयोजित केलेल्या नक्षत्र बनविण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत कपिल बोरकर यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. चौदा स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.
शिरोडा मतदारसंघ मर्यादित या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक तृप्ती कवळेकर यांना तर तृतीय मॅकलीन प्रुझ यांना मिळाले. स्टँनफर्ड फर्नांडिस व जेनेरा फर्नांडिस यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सुशांत नाईक यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना संकेत मुळे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मनोहर नाईक हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संकेत मुळे म्हणाले, मगो पक्ष हा सर्वधर्म समभाव पाळणारा असून दिवाळी सणात ज्याप्रमाणे आकाशकंदील स्पर्धा घेतली जाते. त्याचप्रमाणे नाताळात नक्षत्र बनविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. समाजाच्या प्रगतीसाठी धार्मिक सलोखा व बंधूभाव आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रेसिला डिप्रुज यांनी सूत्रसंचालन तर गौतमी गावकर यांनी आभार मानले.