खानापूर : तालुका समितीत एकी झाल्यानंतर उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे रुपांतर समितीच्या विजयात करून राष्ट्रीय पक्षांचे मनसुभे उद्ध्वस्त करून मराठी बाणा दाखवला पाहिजे, असे उद्गार समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण यांनी खानापूर तालुका म. ए. समितीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले, खानापूर तालुका म. ए. समितीच्या एकीसाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने एकी झालेली आहे. यामुळे समितीत वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या निवडणुकीत निश्चित समितीचा उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही. मध्यवर्ती समिती कोणत्याही घटक समितीत हस्तक्षेप करणार नाही. घटक समितीने आपला उमेदवार जाहीर करावा आणि प्रचाराला लागावे. खानापूर समितीने याबाबत योग्य नियोजन केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी नारायण कापोलकर, मारुती परमेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, अॅङ एम. जी. पाटील यांची भाषणे झाली. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते नारायण लाड, शंकर पाटील, यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, रुक्माण्णा झुंजवाडकर, बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील, कृष्णा मन्नोळकर, पांडुरंग सावंत, संतोष पाटील, वसंत नावलकर, विठ्ठल गुरव, महादेव घाडी, मऱ्याप्पा पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleकामतगा येथे जलजीवन योजनेमुळे रस्त्याची वाताहत
Next Article नेरसा-मणतुर्गा म. ए. समितीची जागृती सभा
Related Posts
Add A Comment